एप्रिलपासून गॅस होणार महाग

Foto
1 एप्रिलपासून आपलं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. कारण सरकार घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती 18 टक्क्यांनी वाढवू शकते. नवे दर 1 एप्रिल 2019पासून लागू होणार आहेत. नव्या घरगुती गॅस धोरण 2014अंतर्गत दर सहा महिन्यांनी नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवल्या जातात.

हा फॉर्म्युला परदेशी बाजारातल्या किमतीवर आधारित असतो. सरकारच्या या निर्णयामुळे वाहनांमध्ये इंधनाच्या स्वरूपात वापरण्यात येणारा सीएनजी आणि घरगुती जेवण बनवण्यासाठी वापरात येणार्‍या पीएनजी गॅसच्या किमती वाढणार आहेत. यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

रेटिंग एजन्सी केअर रिपोर्टनुसार, घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती 18 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल आणि एनर्जी सेक्टरमध्ये महागाई वाढू शकते. भारतातल्या नैसर्गिक गॅसच्या किमती या गॅस वितरक देश असलेल्या अमेरिका, रशिया आणि कॅनडा यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार ठरतात. एप्रिल-सप्टेंबर 2019च्या तिमाहीमध्ये नैसर्गिक गॅसच्या किमती 3.36 डॉलरवरून वाढून 3.97 डॉलर होण्याची शक्यता आहे. अशातच कंपन्याही भारतातले दर वाढवू शकतात.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker